Free Udemy Courses and Zero Broken link.
The only website where expired courses are deleted.

शिक्षकांचा 'पारस' -शिकवण्यातून स्वत:च्या पॅॅॅॅशनकडे

Share :

Publisher : Madhuri Yadwadkar

Course Language : Marathi

पारस हा कोर्स शिक्षकांसाठी खास तयार केला आहे.

'पारस' संकल्पना रुजवण्यासाठी विवेकनिष्ठ विचार ('Rational Emotive Behaviour Therapy'), सकारात्त्मक शिस्त अशा विचारशास्त्रांचा वापर केला आहे 

'रचनावादी शिक्षणपद्धतीने'  म्हणजे- 1. अनुभवातून शिकणे, 2. संकल्पना तपासून बघण्यासाठी प्रयोग करून बघणे, 3. संकल्पना स्वत:च्या जगण्याशी जोडणे आणि 4. वेगवेगळ्या माध्यमांतून 'पारस'ची अभिव्यक्ती - या टप्प्यांच्या आधारावर या कोर्सची रचना केली आहे.

'पारस'चा शोध घेताना मन, बुद्धी आणि अंतर्मनाची मदत घेण्यासाठी खास उपक्रम योजले आहेत.

गाणी, गोष्टी, कोडी आणि उपक्रमांमुळे हा कोर्स सोपा आणि रोमांचकारी झाला आहे.  

प्रत्येक सत्राच्या शेवटी दिलेल्या प्रश्नावली, उपक्रम आणि assignments सोडवल्यानंतर शिक्षकांना, त्यांना नेमके काय हवे आहे याची अधिक स्पष्टता येईल, त्यांच्या धारणा तपासल्या जातील. हे उपक्रम विद्यार्थ्यांबरोबर घेतल्यानंतर विद्यार्थ्यांमधेही तो झपाटलेपणा नकळतपणे उतरेल.  

प्रत्येक शिक्षकाने 'पारस'च्या माध्यमातून स्वत:ला हवं ते साधणं हे आपोआपच दर्जेदार शिक्षणाप्रती एक उत्तम योगदान असणार आहे.