Free Udemy Courses and Zero Broken link.
The only website where expired courses are deleted.

NHM - DHIS Training

Share :

Publisher : NHM Amravati

Course Language : Hindi

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम, ई-प्रशिक्षण !

DHIS  पोर्टल चा वापर आपण आपल्या कामकाजाची माहिती भरण्यासाठी करतो त्यासाठी दर वर्षी जिल्हा स्तरावर पारशिक्षण आयोजित जाते. २०१७ पासून मात्र आपण यासाठी ई प्रशिक्षणाचा वापर करतो आहोत. या उपक्रमाचं श्रेय, अर्थातच तुमच्यावर अवलंबून आहे. 
DHIS पोर्टल हा माहितीचा एक प्रचंड मोठा साठा आहे. या माहितीचा परस्पर संबंध सुद्धा साधता येतो. याचा उपयोग, आरोग्य विषयक वस्तुस्थिती समजण्यासाठी तर होतोच पण त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी निर्णय घेणेसुद्धा सोप्पे होते. 
या ई प्रशिक्षणामुळे क्लासरूम ट्रेनिंग वरती होणारा दर वर्षीचा खर्च तर वाचेलच पण तुमचा वेळ, दगदग आणि ताण यामध्येही फरक पडेल.

तंत्रज्ञानाचा वापर करून, बसल्या जागी, जेव्हा वेळ असेल तेव्हा आणि पुन्हा पुन्हा बघता येतील अशी हे ई प्रशिक्षण आहे. यामध्ये विषयानुसार ई ट्युटोरिअल्स बनवलेली आहेत. तुमच्या संबंधीचे ई ट्युटोरिअल तुम्ही बघा. सगळे ई ट्युटोरिअल्स सगळ्यांना बघण्याची गरज नाही. तुमच्या कामाशी संबंधित असलेले ई ट्युटोरिअल पाहून झाल्यावर काही प्रश्न असतील तर Q & A या भागात तुम्ही ते आम्हाला विचारू शकता. आमचे तज्ञ तुमच्या प्रश्नांची उत्तरे तिथेच देतील. तुम्हाला तुम्ही पाहिलेले ई ट्युटोरिअल पुरेसे समजले आहे का हे तुम्ही शकता. यासाठी एक छोटी प्रश्नावली तुम्ही ऑनलाईनच भरायची आहे. प्रत्येक ई ट्युटोरिअल जवळ त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रश्नावलीची लिंक दिलेली आहे. 
चला तर मग, आपण सारे मिळून हा प्रयोग यशस्वी करूयात !